भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून अलिकडेच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने क्रिकेटच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. या खेळाडूची प्रथम श्रेणी कारकीर्द खूप संस्मरणीय होती आणि त्याने त्याच्या संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. टीम इंडियात जागा पटकावण्यासाठी सलामीवीराने खोऱ्याने धावा केल्या, परंतु त्याला संधीच मिळाली नाही.