Rishabh Pant faces tough competition from Sanju Samson and Dhruv Jurel as India rethinks its ODI wicketkeeper options
esakal
Sanju Samson performance IPL 2026 selection chances : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये अडखळणारा रिषभ पंत, टीम इंडियाच्या वन डे संघातूनही बाद होणार आहे. यष्टीरक्षक-फलंदाजाचे भारतीय वन डे संघातील स्थान धोक्यात आले आहे, कारण संघ व्यवस्थापन संजू सॅमसन आणि उदयोन्मुख ध्रुव जुरेल यांसारख्या पर्यायांचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२६ मध्ये पंत खराब फॉर्ममध्ये आहे, तर दुसरीकडे सॅमसनने धावांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले आहे. ज्यामुळे पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलचा राखीव खेळाडू म्हणून त्याची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.