Bangladesh refuses to travel India T20 World Cup security
esakal
Bangladesh refuses to travel India T20 World Cup security: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकणे एवढे सोपे नाही, हे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ( BCB) अखेर समजले आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) एक पत्र पाठवले आहे. बांगलादेशने मुस्ताफिजूर रहमान याच्या आयपीएलमधील हकालपट्टीचा मुद्दा घेत भारतात क्रिकेट खेळणे आमच्या खेळाडूंसाठी सुरक्षित नसल्याचे आयसीसीला कळवले होते. पण, आयसीसीने असा कोणताही धोका बांगलादेशी खेळाडूंना नसल्याचे सांगत, त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली. अखेर बांगलादेश सरकार व बीसीबीने काल भारतात खेळणार नसल्याची त्यांची भूमिका कायम असल्याचे जाहीर केले आणि T20 world Cup स्पर्धेवर बहिष्कार टाकला.