Aishwarya Rai Received Her First Film Award
esakal
Aishwarya Rai received her first award from Rahul Dravid : क्रिकेट आणि बॉलिवूड हे नातं काही नवं नाही. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटूंची नावं बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडली गेली, त्यापैकी काहींनी संसारही थाटला. पण, सोशल मीडियावर असा एक Video Viral झाला आहे, तो पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. यात कोणाची प्रेमकहाणी किंवा काही वादग्रस्त नाही. पण, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा हा व्हिडीओ आहे आणि तिच्या कारकीर्दितील पहिला पुरस्कार तिला भारतीय क्रिकेटमधील एका युवा खेळाडूच्या हस्ते दिला गेला होता. तो क्रिकेटपटू आजच्या युवा पिढीचा आदर्श आहे.