

Ranji Trophy Mumbai vs Jammu-Kashmir: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत सध्या बीकेसीमध्ये सुरू असलेला मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर सामना बराच चर्चेत आहे. या सामन्यातून मुंबईकडून अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत, ज्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने रणजीत पुनरागमन केले आहे, तर कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर असे खेळाडूही संघात आहेत.
दरम्यान असे असतानाही शार्दुल वगळता मुंबईचे स्टार खेळाडू प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. यातच या सामन्यात पंचांचे निर्णय देखील वादग्रस्त ठरताना दिसत आहेत.