

Mumbai vs Jammu-Kashmir: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून बीकेसीमध्ये मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर संघात सामना सुरू आहे. या सामन्यातून रोहित शर्माने १० वर्षांनी रणजीमध्ये पुनरागमन केले आहे, तर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे असे स्टार खेळाडूही मुंबईकडून खेळत आहेत.
परंतु, असे असतानाही मुंबईची अवस्था फारशी चांगली नसल्याचे दिसून येत आहे. त्यातही जम्मू-काश्मीरच्या कर्णधाराने मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा अफलातून झेल घेत सर्वांनाच चकीत केले.