
मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने रणजी करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करताना संघाला उपांत्य फेरीतपर्यंत पोहचवले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अजिंक्यच्या १०८ धावांच्या खेळीने हरियानाला बॅकफूटवर फेकले आणि त्यानंतर गोलंदाजांच्या कामगिरीने मुंबईला अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवून दिले. रणजी करंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत सर्वाधिक धावांचा पराक्रम अजिंक्यने केला होता.