IND vs SA: कधीकधी अतिशहाणपणा नडतो...! अजिंक्य रहाणे प्रचंड संतापला; भारतीय संघाच्या पराभवावर म्हणाला, तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला...

Ajinkya Rahane reaction after India vs South Africa defeat: भारताच्या सुपर ८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ७६ धावांच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे यांनी संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. “तुम्ही जरा जास्तच शहाणपणा केला,” असे म्हणत त्यांनी वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Ajinkya Rahane reaction after India vs South Africa defeat

Ajinkya Rahane reaction after India vs South Africa defeat

esakal

Updated on

Ajinkya Rahane Criticises India’s Match-Up Strategy: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या निवडीवर व रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील पहिल्याच सामन्यात भारताला ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sundar) निवडीवरून सर्वांनीच टीका केली आहे. आफ्रिकेच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्याने सुंदरची निवड केल्याचा बचाव केला गेला. पण, संपूर्ण सामन्यात त्याला फक्त दोन षटकं फेकायला दिली. त्याने पॉवर प्लेमध्ये टाकलेल्या या दोन षटकांत १७ धावा दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com