What does Agarkar mean by Rohit and Virat are “non committal
esakal
Ajit Agarkar condition for Rohit and Virat selection : विराट कोहली व रोहित शर्मा हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वन डे मालिकेत खेळणार, हे आता स्पष्ट झाले आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन डे व ट्वेंटी-२० संघ जाहीर केले. पण, वन डे संघाच्या कर्णधारपदात बदलाची घोषणा केली. रोहित शर्माच्या खांद्यावरून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे आणि आता शुभमन गिल हा कसोटीपाठोपाठ वन डे संघाचाही कर्णधार असणार आहे. हे रोहित व विराट यांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संकेत आहेत.