East Zone vs South Zone Duleep Trophy final live streaming
esakal
Vaibhav Sooryavanshi vs South Zone Duleep Trophy final : भारतीय संघाचा उगवता तारा म्हणून चर्चेत असलेल्या वैभव सूर्यवंशीला प्रथम श्रेणीमध्ये आपली छाप सोडण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. दुलीप ट्रॉफीची फायनल रविवारपासून चेन्नईत पूर्व विभाग विरुद्ध दक्षिण विभाग या संघांत होणार आहे आणि हा सामना पाहण्यासाठी निवड समिती प्रमुख अजित आगरकर ( Ajit Agarkar) स्टेडियमवर उपस्थित राहणार आहेत. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाती स्टार खेळाडू पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. लोकेश राहुलने ( KL Rahul) मात्र या सामन्यातून माघार घेतली आहे.