मोहम्मद शमीला न खेळवण्यावरून अजित आगरकर अडचणीत... 'त्याची निवड का केली जात नाही?', माजी खेळाडूने साधला निशाणा

Harbhajan Singh criticises Ajit Agarkar : भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला सलगपणे संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय चाहत्यांसह माजी खेळाडूंनाही धक्का देणारा ठरत आहे.
Harbhajan Singh questions Ajit Agarkar’s decision to omit Mohammed Shami

Harbhajan Singh questions Ajit Agarkar’s decision to omit Mohammed Shami

esakal

Updated on

Ajit Agarkar under scanner for dropping Shami from ODI squad : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत काल बंगालकडून ४ विकेट्स घेतल्या. त्याने रणजी करंडक स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी केली होती, तरीही त्याच्यासाठी भारतीय संघात पुनरागमनाचे दरवाजे बंद ठेवले जात आहेत. इंग्लंड दौरा, घरच्या मैदानावरी वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका.. यात शमीला डावलले गेले. आता यावरून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh ) याने निवड समिती प्रमुख अजित आगरकर याच्यावर टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com