Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

AJIT AGARKAR VS BCCI: अजित आगरकर यांच्या बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या चर्चेदरम्यान भारतीय क्रिकेटमधील काही जुन्या घडामोडी पुन्हा समोर येत आहेत.
chief selector Ajit Agarkar 

chief selector Ajit Agarkar 

esakal

Updated on

Ajit Agarkar vs BCCI captaincy decision: अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांच्या वादाला नेमकी केव्हापासून सुरूवात झाली? रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) वन डे संघातील स्थानावरून घेतलेल्या निर्णयावरून अजित व बीसीसीआय समोरासमोर आल्याचे, आतापर्यंत सर्वांना वाटत होते. पण, या धुसफूसला २०२३ पासून सुरूवात झाली. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी क्रिकेट वर्तुळात जोरदार स्पर्धा आहे आणि त्यामुळेच नाराजीनाट्यही रंगताना अनेकदा पाहायला मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com