
इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅमला सुरू आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर चौथ्या दिवशी इंग्लंड समोर ६०८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पण पाचव्या दिवसावर पावसाचे सावटही आहे. याचा अनुभव दोन्ही संघांना पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच आला.
भारताचा कर्णधार शुभमन गिलला चौथ्याच दिवशी पावसाचे अपडेट्स इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने दिले होते. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. पण गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या ब्रुकला दुसऱ्या डावात मात्र फार काही करता आलेला नाही.