US Open 2026: डायबेटिस भविष्य ठरवू शकत नाही! चॅम्पियन झाल्यानंतर झ्वेरेवने मानले आईचे आभार; पाहा भावनिक Video

Alexander Zverev Credits Strong Mother After US Open 2026 Triumph: जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने अमेरिकन ओपन २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. या विजेतेपदानंतर त्याने त्याला लहानपणी डायबेटिस झाल्यानंतरही त्याच्या आईने घेतलेल्या निर्णयाबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
Alexander Zverev Won US Open 2026

Alexander Zverev Won US Open 2026

Sakal

Updated on

Alexander Zverev Won US Open 2026 : अमेरिकन ओपन २०२६ स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी स्पर्धेचे विजेतेपद जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने जिंकले. तो या स्पर्धेचा नवा विजेचा ठरला. त्याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनवर चार सेटमध्ये विजय मिळवला आणि कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले. त्याने याचवर्षी फ्रेंच ओपनचेही विजेतेपद जिंकले होते.

३ तास ३३ मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात झ्वेरेवने ६-३, ७-६(२), ५-७, ६-२ अशा चार सेटमध्ये शेल्डनवर मात केली. या विजयामुळे झ्वेरेवने अव्वल क्रमांक मिळवण्याच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. २००३ मध्ये अँडी रॉडिकनंतर मेजर एकेरीचे विजेतेपद जिंकणारा पहिला अमेरिकन पुरुष खेळाडू बनण्याच्या प्रयत्नात शेल्टन होता. पण झ्वेरेवने कमालीचा खेळ दाखवत विजेकेपद जिंकले.

Alexander Zverev Won US Open 2026
US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com