

BCCI gives ultimatum to Rohit Sharma: क्रिकेटचं फॉरमॅट बदललं पण रोहित शर्माचं नशीब काही बदलण्याचं नाव घेत नाहीए. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहित ७ चेंडूंत २ धावा करून तंबूत माघारी परतला. कसोटी मालिकेतील अपयश बाजूला ठेवून रोहित किमान त्याच्या घरच्या मैदानावर चांगला खेळ करेल असे वाटले होते, परंतु त्याने निराश केले. साकिब महमूदच्या गोलंदाजीवर रोहित मिड ऑनवर उभ्या असलेल्या लिएम लिव्हिंगस्टोनच्या हाती झेल देऊन परतला. रोहितचे हे सातत्याने अपयशी ठरणे BCCI लाही आता सहन होईना आणि त्यामुळे त्यांनी आता रोहितला शेवटची वॉर्निंग दिली आहे. रोहितचे कर्णधारपद आता संकटात आले आहे. टीम इंडियातही रोहितसोबत Mumbai Indians सारखाच गेम होण्याचा अंदाज आहे.