

Alyssa Healy Bids Adieu After Perth Test
Sakal
Australia’s 10-Wicket Victory over India: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने कर्णधार एलिसा हेलीला विजयी निरोप दिला आहे. पर्थमध्ये भारतीय महिला संघाविरुद्ध पार पडलेल्या एकमेव दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी (रविवार, ८ मार्च) १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
हा सामना एलिसा हेलीचा (Alyssa Healy) ऑस्ट्रेलियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यानंतर तिने निवृत्ती (Retirement) घेणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे तिच्यासाठी हा भावनिक सामनाही होता.
या सामन्यासाठी तिचे कुटुंबिय देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. दरम्यान, तिला सामन्यानंतर ऍश्ले गार्डनर आणि एलिसा पेरी यांनी मैदानात खांद्यावर उचलून घेत फिरवले.