२५ चेंडूंत १२६ धावा; शेवटच्या चेंडूवर षटकार अन् द्विशतक! Aman Rao ने शमी–आकाश दीपला धुवून काढत मोडला वैभव सूर्यवंशीचा विक्रम

Aman Rao double century Bengal vs Hyderabad: विजय हजारे ट्रॉफीच्या चालू हंगामात अमन रावने अक्षरशः चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना अवघ्या २५ चेंडूंत १२६ धावा कुटल्या. त्याने वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडीत काढला आणि बंगाल विरुद्ध हैदराबाद सामन्यात ऐतिहासिक खेळी साकारली.
Vijay Hazare Trophy: Aman Rao Becomes Second Double Centurion This Season

Vijay Hazare Trophy: Aman Rao Becomes Second Double Centurion This Season

esakal

Updated on

Aman Rao six on last ball to complete double hundred: हैदराबादच्या २१ वर्षीय सलामीवीर अमन राव याने विजय हजारे ट्रॉफीत धुमाकूळ घातला. मोहम्मद शमी ( Mohammed Shami), आकाश दीप व मुकेश कुमार या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना त्याने चांगलाच चोप दिला. बंगालविरुद्ध त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपले द्विशतक पूर्ण केले. त्याच्या या द्विशतकात १२ चौकार व १३ षटकारांचा समावेश होता. त्याने या खेळीसह १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Suryavanshi) मागे सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com