

Amol Muzumdar | Harmanpreet Kaur
Sakal
Amol Muzumdar Calls Harmanpreet Kaur Best Captain: भारतीय महिला संघाने गेल्यावर्षी २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात आणि अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा जिंकत इतिहास घडवला.
मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने अनेक मोठे आणि अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. भारतीय महिला संघाने आशिया कपही जिंकला, तसेच लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या महिला कसोटीतही भारतीय संघाने इंग्लंडला हरवण्याचा पराक्रमही गाजवला.
दरम्यान, मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवलेल्या मुजुमदार यांनी या आठवणींना नुकताच उजाळा दिला. याशिवाय त्यांनी रमाकांत आचरेकर सरांकडून मिळालेल्या शिकवणीबद्दलही भाष्य केले. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच मुजुमदार देखील आचरेकर सरांचे शिष्य होते. त्यांच्याच मार्गदर्शनात ते घडले.