

Amol Muzumdar | India vs South Africa | Women's World Cup 2025 Final
Sakal
भारतीय महिला संघ विश्वविजेता ठरला. रविवारी नवी मुंबईत महिला वनडे वर्ल्ड कप भारताने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात जिंकला. या स्पर्धेत सलग तीन पराभवानंतर भारताने अफलातून पुनरागमन केले. इतकंच नाही, तर ७ वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पराभूत करत महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मात दिली आणि पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरले. पण भारतीय संघाच्या या यशामागचा एक महत्त्वाचा चेहरा राहिला, तो म्हणजे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार.
सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने धावफलकावर ३३८ धावा लावल्यानंतर भारतीय संघाला त्यांच्यापेक्षा फक्त एक धाव जास्त करायची आहे, असं सांगत ज्याने संघातं मनोबल वाढवलं होतं, तो मुजूमदारच होता.