

Key Takeaways from India's Tour of Australia : १० वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी खूपच लाजीरवाणी झाली. जसप्रीत बुमराह एकटा लढा देताना दिसला. यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल यांनी काही सुरेख खेळी केल्या. नितीश कुमार रेड्डी व विराट कोहलीचे शतक वगळल्यास फार सातत्य त्यांच्यात दिसले नाही. ऋषभ पंतला अतीघाई नडली. रोहित शर्मा तर अडखळताना दिसला.