Andre Russell 5000 runs 500 wickets 500 sixes record
esakal
First cricketer with triple 500 milestone in T20 cricket : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या आधी आंद्रे रसेलला ( Andre Russell ) रिलीज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आंद्रे रसेलने निवृत्ती जाहीर करताना KKR च्या प्रशिक्षकाची जबाबदारी हाती घेतली. पण, वेस्ट इंडिजच्या या माजी खेळाडूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम केला आहे, जो पाहून KKR ला नक्कीच पश्चाताप होईल. ILT20 च्या सामन्यात रसेलने अबू धाबी नाइट रायडर्सकडून खेळताना डेझर्ट वायपर्सविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.