
बांगलादेश संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिक खेळत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना पाचव्या दिवसाच्या खेळानंतर अनिर्णित राहिला आहे. गॉलला झालेला हा सामना श्रीलंकन क्रिकेट संघासाठी आणि चाहत्यांसाठी मात्र भावनिक ठरला.
श्रीलंका संघाचे कसोटीत १६ वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली. हा खेळाडू म्हणजे ३८ वर्षेीय अँजेलो मॅथ्यूज.