Ravi Shastri reveals reason behind Kohli's retirement
भारतीय कसोटी संघात स्थित्यंतराचे वारे वाहू लागले आहेत. रोहित शर्मा अन् विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दोघांचा फॉर्म त्यामागील कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या भविष्यातील रणनीतींमध्ये ही दोघं बसत नसल्याने त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडले गेले, असाही दावा केला जातोय. विराटचा फिटनेस पाहता त्याने २-३ वर्ष तरी कसोटी क्रिकेट खेळायला हवं होतं, परंतु त्याच्या निवृत्तीच सर्वांना धक्का बसला आहे. त्याने हा निर्णय घेण्यापूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कॉल केला होता आणि त्यात काय चर्चा झाली, याचा उलगडा झाला आहे.