
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून सोमवारी (१२ मे) निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सध्याच्या काळातील सर्वोत्तम कसोटीपटूंमध्ये विराटला गणले जाते.२०११ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने १४ वर्षे मैदान गाजवताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले.