
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) सर्वांना मोठा धक्का दिला. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. १४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्याने कसोटीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या १४ वर्षात विराटने कसोटीत यशाची अनेक शिखरे पार केली. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. विराटने यापूर्वीच टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
त्यामुळे आता विराट भारताकडून टी२० आणि कसोटीत खेळताना दिसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण विराटने अद्याप वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे वनडेमध्ये तो अजूनही खेळताना दिसू शकतो.