
Australia vs India 4th Test: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बॉक्सिंग डे कसोटीत भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे भारताला हे लक्ष्य पार करून विजय मिळवायचा असेल, तर इतिहास रचावा लागणार आहे. मात्र भारताची सुरुवात खास झालेली नाही.
भारतीय संघ या सामन्यात शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी संयमी खेळ करताना पहिल्या १६ षटकात एकही विकेट जाऊ दिली नव्हती. मात्र १७ षटक भारतासाठी धक्का देणारे ठरले.