
Australia vs India Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी विक्रमी लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या दिवशी ८३.४ षटकात २३४ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील १०५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य असणार आहे.
भारताला विजय मिळवायचा असेल, तर दिवसातील ९२ षटकात त्यांना हे लक्ष्य पार करावे लागेल, तसेच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवायचा असेल, तर भारताला ३३९ धावांच्या आधी सर्वबाद करावा लागेल. त्यामुळे या सामन्यात आता चारही निकालांची शक्यता आहे.