Arjun Tendulkar gears up for IPL 2026 with an impressive three-wicket haul in a T20 tournament
esakal
Arjun Tendulkar Removes Tejasvi Jaiswal Video : अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या तयारीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईत सुरू असलेल्या डी वाय पाटील ट्वेंटी-२० स्पर्धेत अर्जुनने त्याच्या धारधार गोलंदाजीची झलक दाखवली. त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालचा मोठा भाऊ तेजस्वी याची विकेट घेतली. २८ वर्षीय तेजस्वीने २०२४-२५ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तो त्रिपुरा संघाकडून खेळतो. अर्जुनने या फलंदाजाला २७ धावांवर झेलबाद केले. अर्जुनने टाकलेला चेंडू तेजस्वीने उंच टोलावला, परंतु तो सीमापार जाऊ शकला नाही.