Arjun Tendulkar becomes part of an elite group after opening both the batting and bowling in the same T20 match
esakal
Arjun Tendulkar historic achievement in SMAT: अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अशा विक्रमाला गवसणी घातली, जो विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही जमलेला नाही. अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाकडून खेळतोय. त्याने २०२२-२३ च्या पर्वापूर्वी मुंबईच्या संघाला सोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने २०२०-२१ मध्ये मुंबईकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत त्याने शतकाने कारकीर्दिची सुरूवात केली. अर्जुन गोवा संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतोय.