Ruturaj Gaikwad fifty against Goa Ranji Trophy
Ruturaj Gaikwad fifty Maharashtra vs Goa Ranji Trophy match : गोवा संघाच्या पहिल्या डावातील २०९ धावांच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राला चांगली सुरुवात करता आली नाही. पण, ऋतुराज गायकवाड व सौरभ नवले यांनी अर्धशतक झळकावून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. ऋतुराजने सातत्य राखताना गोवा संघाच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डेतही शतक झळकावले होते. आज त्याने अर्धशतक झळकावून महाराष्ट्राचा डाव सावरला.