Arjun Tendulkar celebrates after taking 3 wickets and smashing a 160-strike-rate cameo
esakal
Goa vs Madhya Pradesh full match report Syed Mushtaq Ali Trophy : अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) अष्टपैलू कामगिरी आणि अभिनव थरेजा व कर्णधार सुयश प्रभुदेसाई यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, गोव्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ लीग सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशचा ७ गडी राखून पराभव केला. अर्जुनने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आणि नंतर सलामीला येताना १६०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.