Arshadeep SinghSakal
Cricket
IND vs ENG: अर्शदीपने इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्सला धाडलं माघारी, चहलच्या विक्रमाला मागे टाकत ठरला 'नंबर वन'
Arshdeep Singh Breaks Yuzvendra Chahal’s Record: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने पहिल्या तीन ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या. यासह त्याने चहलचा मोठा विक्रम मोडला.
India vs England 1st T20I: भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारताकडून सुरुवातही चांगली झाली आहे.

