

मोहम्मद सिराज सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसला.
दरम्यान, तो काही दिवसांपू्र्वीच जेष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसल्याने चर्चेत आला होता. आता जनाईने पुन्हा एकदा त्याच्यासोबत एक पोस्ट शेअर केली आहे.