Ashes Test : बेवडे... इंग्लंडच्या खेळाडूंनी ९ दिवसांच्या सुट्टीत ६ दिवस ढोसली दारू; चौपाटीवर रात्रभर धिंगाणा, ECB म्हणते...

England players drank six days during Ashes break: ॲशेस कसोटी मालिकेत मैदानावर अपयश झेलणाऱ्या इंग्लंड संघावर आता मैदानाबाहेरील वर्तणुकीमुळेही गंभीर आरोप होत आहेत. एका धक्कादायक अहवालानुसार, ॲशेस मालिकेतील ९ दिवसांच्या विश्रांतीदरम्यान इंग्लंडच्या काही खेळाडूंनी तब्बल ६ दिवस दारू पिण्यात घालवले.
ENGLAND PLAYERS DRANK FOR SIX DAYS DURING MID-SERIES BREAK

ENGLAND PLAYERS DRANK FOR SIX DAYS DURING MID-SERIES BREAK

esakal

Updated on

Ashes Test England drinking controversy explained: इंग्लंडच्या संघाला अॅशेस मालिका गमवावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या तिन्ही लढती जिंकून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. खेळाडूंच्या कामगिरीवरून इंग्लंडचा संघ आधीच टीकाकारांच्या रडारवर आहे, त्यात त्यांच्या हातात बेन स्टोक्सच्या टीमला झोडण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत ९ दिवसांच्या विश्रांतीच्या कालावधीत इंग्लंडचे खेळाडू सहा दिवस दारू ढोसत असल्याचे वृत्त समोर आले आहे. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंडचे खेळाडू दिवस-रात्र दारू प्यायले आणि समुद्र किनारी धिंगाणाही घातला. आता वृत्तानंतर चौकशीला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com