Mitchell Starc rushes towards Ben Stokes after a bouncer strikes him on the neck during the Ashes Test.
esakal
Australia vs England Ben Stokes hit on neck by bouncer video: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३७१ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २८६ धावांवर तंबूत परतला. कर्णधार बेन स्टोक्सने एकाकी किल्ला लढवताना ८३ धावांची खेळी केली. स्टोक्स फलंदाजी करत असताना काळजाचा ठोका चुकवणारा क्षण साऱ्यांनी अनुभवला. मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरवर चेंडू स्टोक्सच्या मानेवर जोरात आदळला आणि क्षणात सर्वांना फिल ह्यूज आठवला. २०१४ मध्ये असाच मानेवर चेंडू आदळल्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा मृत्यू झाला होता. तसाच चेंडू स्टोक्सच्या मानेवर आदळला...