

India A Team
Sakal
भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत तिरंगी वनडे मालिका (ODI Tri-Series) खेळत आहे. या मालिकेत भारताने यजमान श्रीलंका अ संघाला पराभूत करत सुरुवात चांगली केली होती. पण नंतर अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारतीय अ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अशातच आता भारतीय अ संघात (India A Team) मोठा बदल करण्यात आला आहे.