Ravichandran Ashwin
Ravichandran Ashwinsakal

Ravichandran Ashwin : अश्विनची कसोटीतून तातडीने माघार

कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट मिळवण्याचा पराक्रम करणारा आर. अश्विन इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यातील पुढच्या खेळात सहभागी होणार नाही.
Published on

राजकोट : कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट मिळवण्याचा पराक्रम करणारा आर. अश्विन इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यातील पुढच्या खेळात सहभागी होणार नाही. कुटुंबामध्ये अचानकपणे वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यामुळे अश्विन तातडीने चेन्नईस रवाना झाला.

Ravichandran Ashwin
Ind vs Eng Test : बेन डकेटचा शतकी ‘दरोडा’ ; ८८ चेंडूंतच शतक, भारतीय गोलंदाजांविरुद्ध धावांची लूट

बीसीसीआयने त्याच्या वैयक्तिक भावनांचा आदर करत त्याला घरी परतण्यास परवानगी दिली आणि इतर कोणतीही मदत करण्याचे आश्वासन दिले. अश्विनच्या माघारीमुळे भारतीय संघ आता उर्वरित खेळात १० खेळाडूंसह खेळेल.

पुढच्या दोन कसोटीतही अश्विन परतण्याची शक्यता कमी आहे. आज खेळ संपल्यावर पत्रकार परिषदेत अश्विनने आपल्या पराक्रमाबद्दल मत व्यक्त केले आणि त्यानंतर तो थेट चेन्नईस रवाना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com