

Team India
Sakal
IND vs SL Test Series Marathi News: भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असून १५ ऑगस्टपासून पुन्हा ऍक्शनमध्ये दिसेल. भारताला श्रीलंकेविरुद्ध १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारताचा संघही (Team India) जाहीर झाला आहे. या संघात दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाचेही (Ravindra Jadeja) पुनरागमन झाले आहे.
तसेच ३१ वर्षीय ऑफ-स्पिन टाकणारा अष्टपैलू सारांश जैनलाही (Saransh Jain) पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी ७ ऑगस्टपासून भारतीय संघ चार दिवसीय सराव सामनाही खेळणार आहे.
दरम्यान, या मालिकेतील सामन्यांसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन (India's Playing XI) कशी असू शकते, याबाबतचे अंदाज भारताचा माजी क्रिकेटपटू आर अश्विनने(R Ashwin) सांगितले आहेत.