आशिया कप २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध खेळवला जाणार आहे.
अजिंक्य रहाणेने त्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली असून त्यात संजू सॅमसनला स्थान नाही.
Ajinkya Rahane’s predicted India XI for Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषक स्पर्धा २०२५ गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ९ ते २८ सप्टेंबर या कालावथीत संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघ ४ किंवा ५ सप्टेंबरला दुबईत दाखल होईल. त्यानंतर १० तारखेला त्यांचा पहिला सामना यजमान युएईविरुद्ध होणार आहे. १५ जणांमधून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल, याची आता उत्सुकता आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने त्याची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.