Arshdeep Singh trolled Haris Rauf
esakal
भारताने आशिया कप सुपर ४ मध्ये पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला.
पाकिस्तान खेळाडूंनी गनफायर आणि विमान क्रॅश सेलिब्रेशन करून भारताला चिडवले.
अर्शदीप सिंगने रौफलाच विमान सेलिब्रेशन करून ट्रोल करत प्रत्युत्तर दिले.
Arshdeep Singh mocks Haris Rauf airplane celebration IND vs PAK : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय...त्यामुळे पाकिस्तान संघाच्या पोटात दुखणे साहजिक आहे. पाकिस्तानला अ गटातील लढतीत चारीमुंड्या चीत करणाऱ्या भारताने सुपर ४ च्या सामन्यातही शेजाऱ्यांचे वस्त्रहरण केले. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी गनफायर सेलिब्रेशन काय केलं, हॅरिस रौफने विमान क्रॅश करण्याचे हातवारे काय केले... एवढं करूनही ते हरले. हॅरिसने सामन्यापूर्वीही भारताला ६-० असे ट्रोल केले होते. पण, आता रौफवर टीम इंडियाचा सरदार भारी पडल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.