आशिया चषक स्पर्धेसाठीच्या बैठकीचं ढाक्यात आयोजन
बीसीसीआयचा या ठिकाणाला कडाडून विरोध
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अप्रत्यक्ष धमकी
Why BCCI wanted to shifted ACC AGM from Dhaka? भारत-पाकिस्तान यांच्यातला वाद क्रिकेटच्या मैदानावरही चिघळत चालल आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या मुद्यावर तर उभय देशांच्या क्रिकेट संघटना समोरासमोर आल्या आहेत आणि त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) नेहमीप्रमाणे बाजी मारलेली दिसतेय. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटनेने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) अध्यक्षपद भूषवित असलेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या ( ACC) सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे. ही बैठक २४ व २५ जुलैला ढाका येथे होणार आहे.