आशिया चषक २०२५ साठीच्या १५ सदस्यीय संघातून श्रेयस अय्यर वगळला गेला, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला.
अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं की श्रेयसची चूक नसली तरी फक्त १५ खेळाडूंची निवड करणे गरजेचं होतं.
यशस्वी जैस्वालच्या जागी अभिषेक शर्मा निवडला गेला कारण तो फलंदाजीसोबत गोलंदाजीचा पर्यायही देतो.
Explains reason behind Shreyas Iyer Asia Cup omission : इंग्लंड दौऱ्यापाठोपाठ आशिया चषक २०२५ स्पर्धेतही श्रेयस अय्यरला दुर्लक्षित ठेवले गेले. श्रेयस अय्यरची चूक नाही, परंतु आमचा नाईलाज आहे, असेच त्यावेळेही सांगितले गेले अन् आताही तेच... देशांतर्गत, आयपीएल आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा टीम इंडियाकडून मैदान गाजवूनही श्रेयस दुर्लक्षित घटक का बनला आहे? संघात एवढी स्पर्धा वाढली आहे की श्रेयसची चूक नसूनही त्याला अंतिम खेळाडूंमध्ये फिट बसवणे अवघड झाले आहे की त्याला खेळवायचेच नाहीए?