Morne Morkel on India team selection Asia Cup 2025
esakal
India predicted playing XI for Asia Cup 2025 opener: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या सामन्यात बुधवारी यजमान संयुक्त अरब अमिराती यांचा ( IND vs UAE) सामना करावा लागणार आहे. या सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार याचे संकेत भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल याने दिले आहेत. भारतीय संघाने आठवेळा आशिया चषक उंचावला आहे आणि यंदाही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. भारतीय संघ दुबईतील वातावरण लक्षात घेऊन चार फिरकीपटूंसह येथे दाखल झाला आहे. मागच्यावेळेस चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईत खेळला होता, परंतु यंदाची येथील वातावरण पाहता वेगळा विचार करावा लागेल, असे मॉर्केल म्हणाला.