आशिया कप २०२५ साठी सूर्यकुमार यादव कर्णधार, शुभमन गिल उपकर्णधार.
श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल संघाबाहेर; आगरकरने दिले स्पष्टीकरण.
जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० संघात पुनरागमन, जितेश शर्मा बॅक-अप विकेटकीपर म्हणून निवडला.
ASIA CUP 2025 INDIA SQUAD: SHREYAS IYER, JAISWAL MISS OUT : ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ मंगळवारी जाहीर केला गेला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली गेली. शुभमन गिल हा उप कर्णधार म्हणून पुन्हा ट्वेंटी-२० संघात परतला आहे. पण, श्रेयस अय्यरची संधी पुन्हा एकदा हुकली आहे. त्यामागचं कारण अजित आगरकरने समजावून सांगितले आहे.