आशिया चषक २०२५ संघ जाहीर आज दुपारी १.३० वाजता सूर्यकुमार यादव व अजित आगरकर करतील.
बुमराहने उपलब्धता कळवली असून त्याची निवड जवळपास निश्चित मानली जाते.
फिरकीला अनुकूल खेळपट्टीमुळे कुलदीप यादव व वरुण चक्रवर्थीला संघात स्थान.
Probable Team India playing XI for Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेसाठी आज दुपारी १.३० वाजता भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करणार आहेत. ९ ते २८ सप्टेंबर या कालावाधीत संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी संघात कोणाला संधी मिळते याची उत्सुकता आहे. निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर संघ निवडताना अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.