आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या निवडीची शक्यता कमी आहे.
सूर्यकुमार यादव फिटनेस टेस्टनंतर खेळणार हे निश्चित झाले आहे.
Asia Cup 2025 India probable squad news : आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत दमदार खेळ करणाऱ्या थोड्याच खेळाडूंना या स्पर्धेसाठी निवडले जाऊ शकते. मात्र, लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल या खेळाडूंना या संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. ९ सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धा होणार आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे ( BCCI) याचे यजमानपद आहे.