Hasaranga copies Abrar Ahmed’s celebration after dismissing Saim in PAK vs SL Asia Cup 2025 clash.
esakal
Pakistan vs Sri Lanka Marathi News: आशिया चषकाच्या फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी पाकिस्तान व श्रीलंकेला विजय आवश्यक आहे. पण, ब गटात अपराजित राहून सुपर ४ मध्ये आलेला श्रीलंकेचा संघ अडखळताना दिसला. सुपर ४ मध्ये बांगलादेशकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि मंगळवारी पाकिस्तानविरुद्धही ते चाचपडताना दिसले. पण, फिरकीपटूंनी श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करून दिले. या सामन्यात एक मजेशीर प्रसंगही पाहायला मिळाला. जेव्हा पाकिस्तानच्या अब्रार अहमदची ( Abrar Ahmed) मस्ती श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाने ( Wanindu Hasarnga) उतरवली.