
आशिया चषक 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव पूर्णतः तंदुरुस्त झाल्यानंतर या स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.
संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनाही संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत.
Asia Cup 2025 India team announcement date : भारतीय संघ आता आशिया चषक स्पर्धेतून अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यांची सर्वांना उत्सुकता आहे. पण, या स्पर्धेसाठीच्या संघात कोणाला संधी मिळेल, हे जाणून घेण्यास सारेच उत्सुक आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यानंतर कसोटी संघातील काही खेळाडू महिनाभर विश्रांती घेऊन ट्वेंटी-२० संघात खेळताना दिसतील. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या खेळाडूला काही विशेष कामगिरी करता आली नसली तरी आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात त्याचे नाव चर्चेत आले आहे.