Sourav Ganguly statement on India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया चषक २०२५ स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) यजमानपदाखाली संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. आशियाई क्रिकेट परिषेदने ( ACC) ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले . भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ताणलेल्या संबंधामुळे आशिया चषक स्पर्धेवर प्रश्नचिन्ह होता. पण, बीसीसीआयने नरमाईची भूमिका घेतली अन् India vs Pakistan सामन्याची तारीखही ठरली. १४ सप्टेंबरला हा सामना होणार आहे आणि भारत-पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान दिले गेले आहे. भारत-पाकिस्तान लढतीला विरोध होत असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाठिंबा दर्शवला आहे.