अजित आगरकरने आशिया कप २०२५ साठी सूर्यकुमार यादव कर्णधार आणि शुभमन गिल उपकर्णधार असलेला १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला.
गिलला विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्याला पुन्हा उपकर्णधारपद देण्यात आले.
रिषभ पंत (दुखापत), मोहम्मद सिराज (वर्कलोड), श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात स्थान मिळाले नाही.
Ajit Agarkar explains Asia Cup 2025 Indian squad selection : सूर्यकुमार यादव कर्णधार, शुभमन गिल उप कर्णधार अशी सुरुवात करत निवड समिती प्रमुख अजित आगरकरने आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघाचे कर्णधारपद हाती घेणाऱ्या शुभमन गिलला आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाईल असे वाटले होते. पण, त्याच्याकडे उप कर्णधारपद पुन्हा आले आणि अक्षर पटेलकडून निसटले... गिलच्या येण्याने प्लेइंग इलेव्हनमधील संजू सॅमसनचे स्थान मात्र धोक्यात आले आहेत.